ajitpawar.org - Ajit Pawar – Ajit Pawar for Maharashtra

Description: अजित पवार - सातत्याने गेली ३ दशके महाराष्ट्राच्या राजकीय-सामाजिक जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या या नेतृत्वाकडे असलेली सर्वांगीण विकासाची दूरदृष्टी थक्क करणारी आहे.

mla (58) baramati (12) leader of the opposition (1) maharashtra nationalist congress party leader (1) finance minister of maharashtra (1) guardian minister of pune (1) leader of the opposition in maharashtra legislative assembly ex-deputy cm maharashtra olympic association ajit pawar address

Example domain paragraphs

महाराष्ट्रासाठी अजित पवार

युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘स्वातंत्र्य या सर्वोच्च मूल्याच्या जपणूकीची प्रेरणा या महाराष्ट्राला दिली.  शाहू-फुले-आंबेडकरांनी प्रबोधन करुन समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी योगदान दिले आणि नवी दिशा दाखवली. साधू-संत, विचारवंत, कवी-लेखक, समाजसुधारक यांनी दाखविलेल्या या वाटेवरून चालताना सोबतीला प्रगतशील तंत्रज्ञानाची, संवेदनशील समाजनिर्मितीची, वैचारिक-आर्थिक समृद्धतेची जोड मिळायला हवी.

समाजरचनेतील शेवटच्या घटकालाही समान संधी मिळावी, खेड्या-पाड्यात, गावात-शहरात कृषी-औद्योगिक विकासाला गती लाभावी, महिलांच्या कुशलतेला आर्थिक प्रगतीची जोड मिळावी आणि युवकांच्या मनगटाला ताकद मिळावी हेच श्री. अजित पवार यांचे ध्येय आहे. कृतिशील, गतिमान प्रशासन हे समाजाचा आरसा असते आणि अजितदादांच्या  प्रत्येक कृतीत याचेच प्रतिबिंब दिसते.