Description: Wedding
wedding (17909) event (14255) party (10079) marriage (2597) function (510)
मराठा मंडळ, ठाणे अनुरूप मराठा विवाह केंद्र आपले सहर्ष स्वागत करीत आहे.
आम्हाला जाणीव आहे की, तुमच्या पसंतीचा जोडीदार प्राप्त व्हावा यासाठी तुम्ही "अनुरूप मराठा विवाह केंद्र" ची निवड केली आहे. ही तुमची निवड सार्थ ठरण्यासाठी आमचे केंद्र तुम्हाला निश्चित सहाय्यभूत ठरेल. नियोजित वधु-वरांना मन पसंतीचा आयुष्याचा जोडीदार प्राप्त व्हावा यासाठी आमचा हा ऑनलाईन प्रयत्न आहे. याआधी मराठा मंडळ, ठाणे हा ठाणे परिसरात गेली ६१ वर्ष कार्यरत असलेला न्यास गेली कित्येक दशके मराठा जाती च्या वधु-वरा साठी वधु-वर सुचक केंद्र चालवीत आहे.
यापुढे तुम्हाला आमच्याकडे ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर मनपसंत स्थळाची माहिती ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. नोंदणी शुल्क रू . १०००/- (एक वर्षासाठी ) असुन फॉर्म मधील माहिती पूर्ण भरून तो आम्हाला पाठवा व तुम्हाला अपेक्षित असलेल्या स्थळांची निवड करूनत्यांचा प्रतिसाद मिळवा. नोंदणी करताना फॉर्म मध्ये तुम्ही दिलेली माहिती/फोटो सुधारित करण्याची सुविधाही तुम्हाला उपलब्ध आहे. तुम्हाला अपेक्षित असलेले स्थळ लवकरात लवकर मिळावे अशी शुभेच्छा व्यक्त करून तुमचे मन:पुर्वक स्वागत करीत आहोत.