nobelfoundation.co.in - Default page

Description: Default page

Example domain paragraphs

नोबेल फाउंडेशन गेल्या सहा वर्षांपासून ग्रामीण तसेच शहरी भागात विज्ञान आणि तंत्रज्ञान बाबत जागरूकतेसाठी आणि संशोधन वाढीसाठी कार्य करीत आहे .   2014 मध्ये ‘ नोबेल प्राइज ’ चळवळीच्या माध्यमातून नोबेल फाउंडेशनचा पाया रोवला गेला . एकविसावे शतक हे तंत्रज्ञानाचे शतक आहे . या शतकात महासत्ता होण्यासाठी प्रत्येक भारतीयाला विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयात गोडी निर्माण करावी लागेल . येणाऱ्या प्रत्येक पिढीला आपल्याला विज्ञानाचा वसा द्यावा लागेल . मात्र आजही आपला समाज अंधश्रद्धा , अनिष्ट रूढी – परंपरा यात अडकलेला आहे . ज

जर प्रत्येक विद्यार्थी विज्ञाननिष्ठ आणि संशोधना – प्रति बांधिलकी असणारा घडत असेल तर भारताला विश्वगुरू होण्यापासून कुणीही थांबवू शकत नाही , म्हणूनच नोबेल फाउंडेशन विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात कार्य करीत आहे . समाजातील सर्वात महत्त्वाचे घटक म्हणजे पालक , विद्यार्थी आणि शिक्षक आहेत . या तिघांनी ठरवले तर शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल घडतील . नोबेल फाउंडेशन या तीनही घटकांच्या सेवेसाठी हातात विवेकाची मशाल घेऊन कार्य पथावर आहे . जळगाव सारख्या ग्रामीण जिल्ह्यातून ही चळवळ सुरू झालेली आहे या चळवळीला आता व्यापक कर

            नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षा ( NSTS ) दरवर्षी महाराष्ट्रभर आयोजित केली जाते . या परीक्षेच्या माध्यमातून मेरीट मध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतीय अवकाश संशोधन संस्था ( इस्रो ) , आयआयटी , आयआयएम यासारख्या उच्च शैक्षणिक संस्थांना विनामूल्य सहलीला नेण्यात येते . तसेच मेरिट मधील तीनशे विद्यार्थ्यांना पुस्तके आणि वैज्ञानिक साहित्य बक्षीस म्हणून दिले जाते . इयत्ता पाचवी ते बारावी मधील विद्यार्थी या परीक्षेला पात्र असून विज्ञान क्षेत्रातील ही राज्यातील अग्रगण्य परीक्षा समजली जाते .